कोरोनामुळे मच्छीमारांवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:48 IST2020-07-27T00:48:04+5:302020-07-27T00:48:08+5:30

आर्थिक मदतीसाठी सरकारला साकडे : कर्जाचे हप्ते भरण्यास त्रास

Corona caused famine on fishermen | कोरोनामुळे मच्छीमारांवर आली उपासमारीची वेळ

कोरोनामुळे मच्छीमारांवर आली उपासमारीची वेळ


अनंत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश हादरून गेला असताना, दुसरीकडे मात्र मासेमारीसाठी लागणाऱ्या होड्या आणि लहान डिझेल इंजिनच्या बोटींसाठी घेतलेल्या बँकांची लाखो रुपयांच्या कर्जांचे हप्ते आणि व्याजाची रक्कम, अतिवृष्टी वादळ यांसारख्या अनेक समस्यांना नवी मुंबईतील लहान-मोठ्या मच्छीमारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्ली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने या मच्छीमार बांधवांची त्वरित दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांच्या वतीने कोकण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवाळे कोळीवाडा, सारसोळे, वाशी, जुहूगाव, करावे, कोपरखैरणे, घणसोली, तळवली, दिवा कोळीवाडा आणि ऐरोली येथील सुमारे ३०० ते ४०० स्थानिक आगरी कोळी मच्छीमार बांधव पिढ्यान्पिढ्यांपासून लहान-मोठ्या होड्या आणि बोटींमधून मासेमारी करतात. मासेमारीचे जाळे आणि होड्यांच्या खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज लॉकडाऊनमुळे वेळेवर भरता आले नाही. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत पारंपरिक मासेमारी व्यवसाय सलग चार महिने लयास गेलेला आहे.
या प्रकरणी नवी मुंबईतील मच्छीमारांच्या वतीने सारसोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम मेहेर यांनी कोकण आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. पारंपरिक मासेमारी करणाºया लहान-मोठ्या बोटींना ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले पाहिजे. बंदरावर कोट्यवधी रुपयांची सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी या कोरोनामुळे विकली न गेल्यामुळे, त्यांना त्वरित नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी परशुराम मेहेर यांनी केली आहे.

पॅकेज जाहीर करण्याची मागणी
कोकण किनारपट्टीला लागूनच नवी मुंबईची खाडी सागरी किनाºयाला मिळत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र पारंपरिक मासेमारी करणाºया मच्छीमारांना सरकारने नुकसान भरपाईपोटी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona caused famine on fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.