टेस्टिंग ट्रॅककडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:13 IST2019-05-21T23:13:29+5:302019-05-21T23:13:34+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय : महापालिकेमार्फत हाईटगेज बसविण्याचे काम सुरू

टेस्टिंग ट्रॅककडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी
नवी मुंबई : वाशी आरटीओच्या नेरु ळ येथील ब्रेक टेस्टिंग ट्रॅककडे आम्रमार्गाकडून येणाºया रस्त्यावर मोठे चढण आहे. या रस्त्यावरून जड-अवजड वाहने ये-जा करत असताना अनेक वेळा अडकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून जड- अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्रमार्गाजवळ हाईटगेज बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून यामुळे आम्रमार्गाकडून ब्रेक टेस्टिंग ट्रॅककडे येणाºया वाहनांना प्रवेश मिळणार नाही.
नेरु ळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कसमोर आरटीओचा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. शांततामय परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया या भागात टेस्टिंग ट्रॅक निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता. यासाठी निवेदने, उपोषण आदी मार्गांचा देखील अवलंब करण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांनी न्याय मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रेक टेस्टिंग ट्रॅकसमोर वंडर्स पार्क असून या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि लहान मुलांची गर्दी असते.
या भागात शाळा देखील आहे. विविध कामासाठी ब्रेक टेस्टिंग ट्रॅकमध्ये येणाºया वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये ट्रॅक, कंटेनर यासारखी जड- अवजड वाहने ये-जा करतात. तसेच वंडर्स पार्कशेजारी वाहने पार्किंग करण्यात येतात.
आम्रमार्गाकडून येणाºया रस्त्याला चढण असल्याने अनेक वेळा कंटेनरसारखी वाहने अडकतात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.