शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

टाकावू पासून टिकाऊ संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे शौचालयात रूपांतर

By नारायण जाधव | Published: December 06, 2023 7:09 PM

महिला व पुरुषांकरिता अत्याधुनिक २ बस टॉयलेटचे लोकार्पण : आ. मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा.

नवी मुंबई भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला  9 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त देशभरात विकास कामांचा अहवाल जनतेच्या घरा घरात पोहचविण्याचे काम चालू आहे. तसेच न.मुं.म.पा च्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आमदार मंदाताई  म्हात्रे यांच्या “टाकाऊ पासून टिकाऊ” या संकल्पनेतून मोडकळीस  आलेल्या  बसेसचे रूपांतर करून महिला व पुरुषांकरिता २ बसेस उपलब्ध करून डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्य भूमीवर जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसुविधा करिता न.मुं.म.पा.चे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते बसचे उदघाटन  झाले. 

महापालिका आयुक्त यांनी सांगितले की, आज आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून ज्या महापालिकेच्या परिवहन विभागातील मोडकळीस आलेल्या बसेसचे रुपांतर टॉयलेटमध्ये करून महिला व पुरुषांकरिता शौचालय उपलब्ध करून दिले यामुळे सायन-पनवेल हायवेमार्गावरील प्रवासांना एक सुविधा उपलब्ध झाली. अजून अश्या जुन्या बसेसची गरज लागेल त्यावेळेस महापालिकेच्या वतीने मोडकळीस आलेल्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील.   यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, जुईनगर हायवे लगत लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उभ्या असतात व नवी मुंबईतील असंख्य नागरिक हे सायन-पनवेल हायवे मार्गाने प्रवास करतात. जेणेकरुन विशेषत: येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी तिथे शौचालायची व्यवस्था नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला पुरुष यांच्यासाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक बस टॉयलेट व्हावे म्हणून जशी एका स्त्रीला लाली टिकली पावडर लावून सजवितात तश्याच प्रकारे माझ्या आमदार निधीमधून आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागामधील मोडकळीस आलेल्या बसेसचे टॉयलेटमध्ये रुपांतर करून महिला व पुरुषांसाठी 2 बसेसचे लोकार्पण झाले. 

सायन-पनवेल हायवे लगत जिथे नागरिकांची मोठ्या संख्येने प्रवासांची ये-जा असते त्या ठिकाणी 20 बसेसची व्यवस्था व प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार म्हात्रे यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुनील पाटील, कुणाल महाडिक, राजेश राय, राजेश पाटील, पांडुरंग आमले, विनायक गिरी, दर्शन भारद्वाज, सुभाष गायकवाड, निलेश पाटील, विनोद शहा, प्रमोद जोशी, जयश्री चित्रे, मनोज मेहेर, संदीप मेहेर असंख्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे