पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:31 PM2019-09-15T23:31:12+5:302019-09-15T23:31:20+5:30

पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत.

Conversion of Khatkunda waste to Kundal in Panvel | पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

googlenewsNext

कळंबोली : पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. परंतु या खतकुंड्यांचे रूपांतर कचरा कुंड्यात झाले आहे. खतनिर्मितीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या कुंड्यात आता कचरा साठवला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने फक्त दिखाऊगिरी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, छोटा खांदा, मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच महापालिकेतील समाविष्ट २९ गावांमध्ये ८0 पेक्षा जास्त कुंड्या बांधण्यात आल्या आहेत. या कुंड्यात ओला कचरा तसेच पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार होते. तयार झालेले खत महापालिका क्षेत्रातील उद्यान, झाडांसाठी उपयोग केला जाणार होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खत तयार झाले तर ते विकण्याचेही प्रयोजन महापालिकेने आखले होते. दोन वर्ष झाले तरी बांधलेल्या खतकुंड्यांत कधीच खत निर्माण झाले नाही. स्वच्छ सर्वेक्षणात फक्त दिखाऊगिरी महापालिकेने केली असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगत आहे. महापालिका हद्दीतील बऱ्याच खतकुंड्यांत कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. नागरिक सर्रासपणे या कुंड्यात प्लॅस्टिक, बाटल्या, घरगुती टाकाऊ कचरा, कपडे इतर कचराही यात टाकला जात आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी आत साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे खांदा वसाहतीतील रहिवासी उमेश मालुसरे यांनी लोकमतला सांगितले. महापालिकेने दिखाऊगिरी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप मालुसरे यांनी केला. तसे पाहता महापालिकेने केलेला प्रयोग फसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांना संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
>एका खतकुंडीला 20 हजार केलेला खÞर्च पाण्यात : पनवेल महापालिका क्षेत्रात 80 खतकुंड्या बांधण्यात आल्या होत्या . त्या बांधण्यातरिता एका खतकुंडीस 20 हजार रु पये खÞर्च करण्यात आले होते. लाखों रु पये खÞर्च करु न सुध्दा या कुंड्यांचा वापर कचरा साठवण्यासाठी केला जात आहे. लाखों रु पये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापन तर झाले नाही . परंतू एक शोभेची वस्तू बनून खतकुंड्या कच-यात पडल्या आहेत.
>दोन वर्षे खतकुंड्या कचºयात पडून
दोन वर्षाअगोदर पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या संकल्पनेतून या कुंड्या बांधण्याचे काम करण्यात आले होते. शिंदे यांच्या बदलीनंतर महापालिकेने दुर्लक्ष केले. दोन वर्षे झाली तरी या कुंड्यांचा खत बनवण्याकरिता वापर केला नाही. तर कचराकुंडी म्हणूनच वापर केला जात आहे.

Web Title: Conversion of Khatkunda waste to Kundal in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.