शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

विनोबानगरमधील शासकीय वास्तूंचे खंडरात रूपांतर, माहिती केंद्रही बंद, गागोदेमधील आदिवासी पाड्याकडेही शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:29 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी येथील विनोबांच्या जीवनाची माहिती देणारे छायाचित्र दालन अनेक वर्षांपासून बंदच आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी येथील विनोबांच्या जीवनाची माहिती देणारे छायाचित्र दालन अनेक वर्षांपासून बंदच आहे. शाळा व समाजमंदिराच्या वास्तूंचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे.गागोदे बुद्रुक गावाला ११ सप्टेंबर १९९२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी भेट दिली होती. या भेटीमध्ये पाच प्रमुख घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये गावामध्ये सभागृह व विनोबाजींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे. विनोबाजींच्या वाड्यापासून जवळच असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करणे. गावामध्ये येण्यासाठीच्या रोडला शिवाजीराव भावे पथ नामकरण, जिल्हा परिषदेच्या शाळेचे नामकरण व बाळकोबा उद्यानाची घोषणा करण्यात आली होती. गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याचे नावही विनोबानगर करण्यात आले होते. आदिवासी पाड्यामध्ये १९९२मध्ये लावलेली पाटी अजूनही जशीच्या तशी आहे. भारतरत्न विनोबाजींचे नाव आदिवासी पाड्याला दिले असले, तरी मागील २५ वर्षांमध्ये येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकारचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. गावामध्ये शाळा, समाजमंदिर व इतर कामांसाठी सरकारच्या निधीमधून इमारती बांधण्यात आल्या आहेत; परंतु त्या इमारतींचा योग्य वापर केला जात नाही. यामुळे अनेक वास्तूंचे खंडरात रूपांतर झाले आहे. आदिवासी पाड्यावर चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या शाळेचा दर्जा चांगला व्हावा, यासाठीही ठोस काहीही करण्यात आलेले नाही.विनोबानगरमध्ये विनोबा सेवा संस्था या सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ शिक्षण, लोकजागृतीची कामे केली जात आहेत. आदिवासी पाड्यामधील बालविवाह थांबविण्यात यश मिळविले आहे. येथील मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊ लागली आहेत. आर्थिक स्तर वाढू लागला आहे. गतवर्षी गावातील मुलांनी स्वकष्टातून २६ मोटारसायकल खरेदी केल्या आहेत. मुलांच्या आरोग्यासाठीही संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विनोबा सेवा संस्थेचे सचिव राजीव गागोदेकर यांनी दिली. यापूर्वी विनोबानगरमध्ये महाविद्यालयीन मुलांसाठी श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जात होते; परंतु मुलांमध्ये विनोबाजींचे विचार शिकण्यापेक्षा सहलीला आल्यासारखे वर्तन होऊ लागल्याने शिबिरे बंद केली आहेत. या ठिकाणी विनोबाजींच्या जीवनाविषयी माहिती देणारे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यात आले आहे; परंतु विनोबानगरमध्येभेट देण्यासाठी नागरिकच येत नसल्याने ते केंद्र बंद पडले आहे. वास्तूची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ते माहिती केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.नामफलकांच्या पाट्याआदिवासी पाड्याचे १९९२ मध्ये सुधाकर नाईक यांच्या हस्ते विनोबानगर असे नामकरण केले. पाड्याच्या सुरवातीला नामफलकाची पाटील दिमाखात उभी आहे. याशिवाय समाजमंदिर, शाळा व इतर वास्तूंवरही कोणत्या निधीमधून इमारत बांधण्यात आल्या. त्याच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पाट्या सुस्थितीमध्ये असल्या तरी इमारतींची अवस्था मात्र बिकट झाली आहे. या इमारतींची डागडुजी करून त्यांचा योग्य वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.माहिती केंद्र सुरू व्हावे1विनोबानगरमध्ये पूर्वी विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. येथील प्रदर्शनामधून विनोबाजींच्या जीवनाविषयी माहिती युवा पिढीला होत होती; परंतु विद्यार्थ्यांमध्ये विनोबाजींचे विचार शिकण्याची मानसिकता राहिली नसल्याने येथील शिबिरे बंद झाली असली तरी ती पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सरकारी इमारतींचे खुराडे2विनोबानगरमधील समाजमंदिर, जुनी शाळा व इतर वास्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. वास्तविक या ठिकाणी विनोबाजींच्या कार्याची माहिती देणारे स्मारक असणे आवश्यक आहे. गावामध्ये व आदिवासी पाड्यामध्येही दोन टप्प्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले तर देशभरातील नागरिकांमध्ये विनोबाजींचे विचार रुजविणे सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार