ठेकेदारच टाकताहेत डेब्रिज

By Admin | Updated: May 20, 2014 02:14 IST2014-05-20T02:14:13+5:302014-05-20T02:14:13+5:30

रस्ते व पदपथ बनविणारे ठेकेदार मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकत आहेत. सीवूड-नेरूळ दरम्यानच्या रोडवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले

The contractor is leaving Debbridge | ठेकेदारच टाकताहेत डेब्रिज

ठेकेदारच टाकताहेत डेब्रिज

नवी मुंबई : रस्ते व पदपथ बनविणारे ठेकेदार मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकत आहेत. सीवूड-नेरूळ दरम्यानच्या रोडवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले असून पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये डेब्रिजची समस्या गंभीर झाली आहे. रोज शेकडो ट्रक डेब्रिज मोकळे भूखंड व सार्वजनिक वापराच्या जागेवर टाकले जात आहेत. डेब्रिज माफियांना आवर घालण्यास पालिकेला अपयश आले आहे. मुंबई, ठाण्यामधून होणार्‍या या अतिक्रमणामध्ये आता पालिकेच्या ठेकेदारांचाही समावेश झाला आहे. शहरात रोड, पदपथ व इतर कामे करणार्‍या ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या परवानगीने योग्य ठिकाणी डेब्रिज टाकणे आवश्यक आहे. परंतु नियम धाब्यावर बसवून जागा मिळेल तेथे डेब्रिज टाकले जात आहे. ठेकेदार अतिक्रमणाची सुरुवात करत असून नंतर त्या जागेवर कचर्‍याचे ढिगारे तयार होत आहेत. सीवूड - नेरूळ दरम्यानच्या रोडच्या दुभाजकाचे कर्बस्टोन बदलण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने जुने कर्बस्टोन काढून ते रोडच्या बाजूला खाडीत व मोकळ्या जागेवर टाकले आहेत. जवळपास ६ ठिकाणी अशाप्रकारचे ढीग लावून ठेवले आहेत. वास्तविक या परिसरात गतवर्षी शेकडो ट्रक डेब्रिज टाकण्यात आले होते. लोकमतने आवाज उठविल्यानंतर सदर अतिक्रमण थांबले होते. आता पुन्हा पालिकेच्या ठेकेदारांनीच डेब्रिज टाकण्यास सुरवात केली असून आता याच ठिकाणी डेब्रिज माफिया पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय देसाई व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अजीज शेख यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होवू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The contractor is leaving Debbridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.