ठेकेदाराने तोडली रेल्वेची संरक्षण भिंत
By Admin | Updated: February 29, 2016 02:13 IST2016-02-29T02:13:33+5:302016-02-29T02:13:33+5:30
सानपाडा रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेची संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांना रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जावे लागत

ठेकेदाराने तोडली रेल्वेची संरक्षण भिंत
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेची संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांना रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जावे लागत आहे. यामुळे कुर्ला ते विद्याविहारप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हार्बर मार्गावर सानपाडा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लादी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी कामगारांना डोक्यावरून वाळू, खडी व सिमेंट घेवून यावे लागत आहे. बांधकाम साहित्य घेवून येण्यासाठी ठेकेदाराने चक्क संरक्षण भिंत तोडून रस्ता
तयार केला आहे. कामगारांना पनवेलवरून सीएसटीकडे जाणारा ट्रॅक ओलांडून साहित्य घेवून जावे लागत आहे.
रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जाताना कुर्ला व विद्याविहार दरम्यान चार कामगारांचा गत आठवड्यात मृत्यू झाला होता. यानंतरही रेल्वे प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. सानपाडामध्येही अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
रेल्वे स्टेशनमध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराने संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांचा जीव धोक्यात घालून त्यांना रेल्वे पटरी ओलांडण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा संबंधितावर दाखल करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.