दोन घरांवर कंटेनर कोसळला
By Admin | Updated: August 19, 2015 01:13 IST2015-08-19T01:13:30+5:302015-08-19T01:13:30+5:30
पनवेलकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे सोमवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास तो बायपासजवळील बंजारा

दोन घरांवर कंटेनर कोसळला
मुंब्रा : पनवेलकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे सोमवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास तो बायपासजवळील बंजारा वसाहतीतील एका मंदिरासह दोन घरांवर कोसळला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.परंतु घरांमधील वस्तूंचे किरकोळ नुकसान झाले. दोन वर्षांपूर्वी याच परिसरात कोसळलेल्या टँकरमुळे एका १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
या रस्त्यावर वारंवार होत असलेल्या अशा प्रकारच्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी बायपास रस्त्याजवळ संरक्षक भिंत बाधण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दीड तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे कंटेनर मूळ रस्त्यावर आणण्यासाठी विलंब झाल्याची माहिती ठामपाचे आपत्कालीन विभागप्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.