शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:44 IST

सफरचंद २०० रुपये किलो, किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू १०० रुपये किलो, डाळिंब ८०, पपई ४०, पेरू १००, संत्री २०० व सीताफळ ८० रुपये किलो दराने विकले जात आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद १४० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात प्रतिदिन जवळपास दीड ते दोन हजार टन फळांची आवक होत असते, परंतु या वर्षी जेमतेम एक हजार टन फळांचीच आवक होत आहे. गतवर्षी उत्सव काळात हिमाचल प्रदेश व काश्मीरमधून ५० ते ६० ट्रक सफरचंदाची आवक होत होती. या वर्षी फक्त १५ ते २० ट्रक येत आहेत. सोमवारी ३३२ टन सफरचंदाची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये सफरचंद ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १४० ते २०० रुपयांवर गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सफरचंदाऐवजी इतर फळांना पसंती दिली आहे.

किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू १०० रुपये किलो, डाळिंब ८०, पपई ४०, पेरू १००, संत्री २०० व सीताफळ ८० रुपये किलो दराने विकले जात आहे. मोसंबी १२० रुपये डझन दराने विकली जात आहे. उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरात हे दर यापेक्षाही जास्त आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. दैनंदिन गरजा भागविणेही अवघड झाले आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. एपीएमसीमध्ये ही ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. या वर्षी सफरचंदाचे उत्पादनही कमी झाले असून, त्याचा दर्जाही हलका आहे, परंतु यानंतरही भाव वाढल्याने सामान्य नागरिक इतर फळांना पसंती देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपल्यानंतरच पूर्ववत खरेदी-विक्री होईल, असा अंदाज फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केला.येथून येतोय मालमुंबईमध्ये हिमाचल प्रदेश व काश्मीरमधून सफरचंद विक्रीसाठी येत आहे. औरंगाबाद व इतर परिसरातून मोसंबी, अहमदनगर, सोलापूर परिसरातून डाळिंब व पुणे परिसरातून सीताफळ विक्रीसाठी येत आहेत. इतर राज्यांतून ही फळे विक्रीसाठी येत आहेत.

टॅग्स :fruitsफळेGanesh Mahotsavगणेशोत्सव