शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सी, सिडकोच्या योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:28 PM

CIDCO Homes: विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - विविध कारणांमुळे सिडकोच्याघरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या असून, नियुक्त होणाऱ्या कंपनीवर  घरांच्या मार्केटिंगसह विक्री आणि इतर संबंधित कामे करावी लागणार आहेत.  पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  नवी मुंबईत येत्या काळात सिडको ६७,००० घरे बांधणार आहेत. यात व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश असणार आहे. टप्प्याटप्प्याने या घरांची सोडत काढण्याची सिडकोची योजना आहे. या नियोजित गृह योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पात्र ठरणाऱ्या खासगी संस्थेवर सोपविली जाणार आहे. विशेष म्हणजे घरांच्या मार्केटिंगसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षीच हलचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यासाठी मागविण्यात आलेल्या एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. परंतु तांत्रिक कारणास्तव बाह्य संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव त्यावेळी बारगळला होता.केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत पुढील चार वर्षांत ८९ हजारे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.  या घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून, बांधकामासाठी कंत्राटदारही नेमण्यात आले आहेत. त्यापैकी काही घरांचे बांधकामसुद्धा सुरू करण्यात आले आहे.   मागील अडीच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी २४ हजार घरांची योजना जाहीर केली. त्याची सोडतही काढण्यात आली. असे असले तरी त्यातील सात हजार घरे अद्यापही विक्रीविना पडून आहेत. एका बाजूला महागड घरे परवडत नसल्याने सामान्यांसाठी सिडको हा आधार असतो.  

जाचक अटी व शर्तींमुळे ग्राहकांची पाठnचार हजार घरे एमएमआरडीए क्षेत्रात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सिडकोने केला. nत्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवून सोडतही काढण्यात आली. परंतु पोलिसांनीसुद्धा ही घरे नाकारली. शिवाय संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेले अनेक पोलीस कर्मचारी ही घरे घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. nत्यानंतर ऑगस्टमध्ये कोविड योद्धांसाठी ४,४६६ घरांची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेलासुद्धा ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. nघर विक्रीचे सध्याचे धोरण, त्यातील अटी व शर्ती जाचक ठरत असल्याने सर्वसामान्य ग्राहक सिडकोचे घर घेण्यास फारसे इच्छुक नसल्याचे दिसून आले.

खासगी विकासकांच्या तुलनेत स्वस्त घरेसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सध्या गृहनिर्मित्तीवर अधिक भर दिला आहे. त्यानुसार विविध घटकांसाठी येत्या काळात ८९ हजार घरे निर्माण केली जाणार आहेत. ही घरे खासगी विकासकापेक्षा १२ ते १५ लाखांनी स्वस्त असतील, असा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे. त्यानुसार तळागाळातील सर्व घटकांना ही घरे घेता यावीत, असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोHomeघरNavi Mumbaiनवी मुंबई