‘खारभूमी’ची बांधकामे प्रगतिपथावर
By Admin | Updated: March 17, 2017 05:51 IST2017-03-17T05:51:53+5:302017-03-17T05:51:53+5:30
मुंबई जलसंपदा विभाग, नाशिक यांत्रिकी विभाग व प्रकल्प संचालक ठाणे यांच्या सहयोगाने महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर

‘खारभूमी’ची बांधकामे प्रगतिपथावर
अलिबाग : मुंबई जलसंपदा विभाग, नाशिक यांत्रिकी विभाग व प्रकल्प संचालक ठाणे यांच्या सहयोगाने महाराष्ट्र शासनाच्या यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर
नादुरुस्त झालेल्या खारभूमी योजनांच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध झाली आहे. ही दुरु स्तीची कामे सुरू झाली असल्याची माहिती ठाणे खारभूमी विकास मंडळ कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
नोव्हेंबर २०१६मध्ये अलिबाग तालुक्यातील माणकुले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या योजनेच्या बांधाच्या दुरुस्तीचे सुमारे १६०० मी. लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ मध्ये जांभूळटेप खारभूमी योजनेचे सुमारे ८०० मी. बांधाचे माती काम पूर्ण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सोनखार उर्णोली या योजनेच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे.
यापूर्वी मार्च २०१६मध्ये कोकणातील सर्वात मोठ्या नारवेल-बेनवले या नादुरु स्त झालेल्या योजनेचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. सोनखार उर्णोली या योजनेचे दुरु स्तीचे काम काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. या सर्व योजनांच्या दुरुस्तीची कामे केल्यामुळे खारभूमी योजनांच्या पुन:प्रापित क्षेत्रात जाणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यास अटकाव होऊन, क्षेत्र पिकाखाली येऊ शकणार आहे.
यांत्रिकी विभागाची यंत्रसामग्री पेण येथील खारभूमी विकास विभागास कायमस्वरूपी लवकरच प्राप्त होणार असून, त्या यंत्रसामग्रीद्वारे समुद्राच्या उधाणामुळे बांधाला पडणाऱ्या खाडीच्या दुरुस्तीचे काम वेळीच पूर्ण करणे शक्य होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)