काँगे्रसचे पदाधिकारी भाजपा, बविआच्या वाटेवर
By Admin | Updated: January 3, 2015 23:49 IST2015-01-03T23:49:15+5:302015-01-03T23:49:15+5:30
जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.

काँगे्रसचे पदाधिकारी भाजपा, बविआच्या वाटेवर
दिपक मोहिते - वसई
जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. गटबाजीला कंटाळलेले काही पदाधिकारी भाजपा व बहुजन विकास आघाडीच्या मार्गावर आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील भाजपच्या
वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.
काँग्रेस पक्षातील बेदीली आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये उमेदवारी देताना डावलले जाण्याची भीती अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ३ ज्येष्ठ पदाधिकारी भाजप व बहुजन विकास आघाडीच्या वाटेवर आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये घालमेल सुरू झाली. येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल का? तसेच उमेदवारी मिळाल्यानंतर आपण निवडून येऊ का? असे अनेक प्रश्न इच्छुकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजप व बहुजन विकास आघाडीकडे अनेक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्यामुळे अनेक पदाधिकारी भाजपात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
४गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्यामुळे अनेक पदाधिकारी भाजपात जाण्याची शक्यता असल्याची र्चचा आहे.