शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिराच्या बांधकामाला एमसीझेडएमएची सशर्त मंजुरी

By नारायण जाधव | Updated: December 21, 2023 16:56 IST

पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम, तिरुमला देवस्थान ट्रस्टला दिलासा.

नारायण जाधव,नवी मुंबई : महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) अटी व शर्तींच्या अधिन राहून सीआरझेड क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या बालाजी मंदिराला मंजुरी दिली आहे. ती देताना किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन आराखड्याला (सीझेडएमपी) विचाराधीन घेतले आहे. परंतु, पर्यावरणवाद्यांनी या मंजुरीला विरोध दर्शविला आहे.

मंदिर भूखंडाच्या सभोवती ५० मीटर एवढा खारफुटींचा बफर झोन असून, हा भाग सीआरझेड-१ मध्ये अंतर्भूत होतो. तरीदेखील एमसीझेडएमए इथे कुंपणाच्या भिंती आणि लॉन्सच्या बांधकामासाठी परवानगी दिली आहे. बफर झोनमध्ये खरंतर कोणताही अडथळा आणता कामा नये, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. दि. २ नोव्हेंबर रोजी एमसीझेडएमएद्वारे घेतलेल्या १७०व्या बैठकीची मिनिट्स एमसीझेडएमएच्या वेबसाइटवर नुकतेच अपलोड झाली आहेत.

याबाबत कुमार म्हणाले की, विस्तीर्ण आंतरभरती पाणथळ क्षेत्रे आणि दलदलींच्या व्यतिरिक्त संपूर्ण ४०,००० चौ. मीटर आकारमानाचा भूखंड मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या कास्टिंग यार्डमधून घेतला आहे. हे कास्टिंग यार्ड स्वतः १६ हेक्टर क्षेत्रावर खारफुटींची कत्तल करून उभारल्याचे वास्तव एमसीझेडएमएने दुर्लक्षित केले आहे. हा भराव काढून खारफुटी, पाणथळ क्षेत्रे आणि दलदलींसह पाच वर्षांआधीच्या त्याच्या मूळ स्वरूपात पुनर्स्थापित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या मंदिराच्या भूखंडाच्या वाटपाला त्यानी आधीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये (एनजीटी) आव्हान दिले आहे. दुसरी आणखीन एक ठळक बाब म्हणजे सीझेडएमपीला केंद्राद्वारे मंजूर करण्यात आले आहे. भूखंडाच्या आराखड्यामधून जाणारी पूररेषा यामध्ये स्पष्ट दाखविली असूनदेखील एमसीझेडएमएने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, याकडे कुमार यांनी लक्ष वेधले.

इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआरएस) अण्णा विद्यापीठ-चेन्नईद्वारे तयार केलेल्या सीआरझेड आराखड्याप्रमाणे, हे स्थळ अंशत: स्वरूपात सीआरझेड१एमध्ये (२,७४८.१८ चौ.मीटर), तसेच अंशत: स्वरूपात सीआरझेड२मध्ये (७,७२९.२८ चौ.मीटर) आणि सीआरझेड क्षेत्राबाहेर (२९,५२३ चौ.मीटर) आहे. प्रकल्प प्रास्ताविकांना बफर झोनमध्ये बागेचे/लॅंडस्केपिंगचे आणि कुंपणाच्या भिंतीचे काम विस्तारण्याची इच्छा होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTempleमंदिर