उद्योजकांना सक्तीची सामाजिक बांधिलकी
By Admin | Updated: November 25, 2014 01:52 IST2014-11-25T01:52:50+5:302014-11-25T01:52:50+5:30
गावातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि सुलभ शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणो सक्तीचे अर्थात बंधनकारक केले आह़े

उद्योजकांना सक्तीची सामाजिक बांधिलकी
नारायण जाधव ल्ल ठाणो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानास देशभर उदंड प्रतिसाद मिळालेला असताना आता राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने उद्योजकांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि सुलभ शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणो सक्तीचे अर्थात बंधनकारक केले आह़े
यासाठी पाणीपुरवठा विभागाने सीएसआर अर्थात कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे उद्योजकांनी त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे, यासाठी धोरण तयार केले आह़े या धोरणानुसार नवीन कंपनी कायदा 2क्13 मधील तरतुदींनुसार ज्या कंपन्यांचा निव्वळ नफा 5 कोटी असेल किंवा वार्षिक उलाढाल 1क्क्क् कोटी असेल किंवा निव्वळ मालमत्ता 5क्क् कोटी असेल़ अशा कंपन्यांनी 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 टक्के नफा सीएसआर कार्यासाठी खर्च करणो बंधनकारक आह़े
केवळ खासगी कंपन्याच नव्हे, महारत्नांसहित सर्व केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांनाही सीएसआरमधील उपक्रम निवडून त्यावर काम करणो बंधनकारक केले आह़े यानुसार या केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांनी त्यांना गतवर्षी झालेल्या नफ्याच्या आधारावर आर्थिक तरतूद करावयाची आह़े यात केंद्रीय कंपन्यांना करपश्चात नफ्यानुसार पुढील प्रमाणो तरतूद करणो बंधनकारक केले आह़े यात 1क्क् कोटींपेक्षा कमी करपश्चात नफा असेल तर 3 ते 5 टक्के, 1क्क् कोटी ते 5क्क् कोटी नफा असेल तर 2 ते 3 टक्के आणि 5क्क् कोटीहून अधिक नफा असेल तर 1 ते 2 टक्के तरतूद करावयाची आह़े उद्योजकांच्या ‘व्यावसायिक क्षेत्रतील सामाजिक बांधिलकीसंदर्भातील धोरण’ यापूर्वी आरोग्य विभागानेही निश्चित केले.
उद्योजकांच्या या सामाजिक उत्तरदायित्त्वाची अंमलबजावणी होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने एक खिडकी दृष्टिकोन अंगीकारताना राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय अशा त्रिस्तरीय सुकाणू समित्या गठित केल्या आहेत़
च्ग्रामपंचायत आणि नगर परिषदांसह समुदाय स्तरावर पाऊसपाणी संकलन अर्थात रेन वॉटर हाव्रेस्टिंग करणो
च्पाणीपुरवठा स्त्रोतांसाठी अर्थसाहाय्य करणो़
च्प्रत्येक कुटुंबार्पयत पिण्याचे पाणी उलब्ध करून देण्यासाठी आराखडे तयार करणो़
च्ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया संयत्रचे आराखडे तयार करून ते बसविणो़
च्पाणीपुरवठा योजनांसाठी अपारंपरिक ऊर्जास्त्रोत उपलब्ध करून देणो़
च्पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांची उभारणी करणो
च्कुटुंबस्तर, अंगणवाडी स्तरावर शौचालये बांधून देणो़
च्महिला स्वच्छतागृहांची उभारणी
च्जैव कचरा व्यवस्थापन राबविणो़
च्सार्वजनिक शौचालये, बायो टॉयलेट, ऑटो क्लीन टॉयलेट देणो
च्स्वंयसाहाय्यता समूहांच्या मदतीने ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन उत्पादन केंद्र विकसित करणो़