उरणमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: September 3, 2015 03:01 IST2015-09-03T03:01:52+5:302015-09-03T03:01:52+5:30

कामगार कायद्यातील बदलांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जेएनपीटी बंदरातील कामगार संघटनांच्या सहभागामुळे बुधवारी बंदरातील कंटेनर हाताळणीचे कामकाज पूर्णत

Composite Composite response in Uran | उरणमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

उरणमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

उरण : कामगार कायद्यातील बदलांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जेएनपीटी बंदरातील कामगार संघटनांच्या सहभागामुळे बुधवारी बंदरातील कंटेनर हाताळणीचे कामकाज पूर्णत: बंद पडले. उरणमधील राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाजही दिवसभर ठप्प होते. जेएनपीटी बंदराअंतर्गत असलेली जीटीआय आणि दुबई पोर्ट या दोन्ही बंदरातील आणि बंदरांवर आधारित बहुतांश सीएफएस, सीडब्ल्यूसी गोदामातील कामकाज सुरळीत सुरू होते. त्यामुळे उरण औद्योगिक क्षेत्रातून तरी संपाला काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला.
कंटेनर आयात-निर्यातीचेच काम ठप्प झाल्याने एकाही कंटेनरची चढ-उतार झाली नसल्याची माहिती बंदराचे मुख्य वरिष्ठ प्रबंधक नरेंद्र कुमार यांनी दिली. जेएनपीटी प्रशासन भवनातही अग्निशमन, हॉस्पिटल आदी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त २०० अधिकारी कामावर हजर होते. त्यामुळे संपाचा प्रशासनाच्या कामकाजावर फारसा परिणाम जाणवला नसल्याचेही जेएनपीटीकडून सांगण्यात आले. जेएनपीटी बंदरावर आधारित जीटीआय आणि दुबई पोर्ट या दोन्ही खासगी बंदरावर संपाचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे बंदराचे काम सुरळीपणे सुरू असल्याची माहिती जीटीआय बंदराचे अधिकारी राजेश सिंग यांनी दिली. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले सीएफएस, सीडब्ल्यूसी गोदामांतील कामकाजही सुरळीत सुरू होते अशी माहिती न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. राजेंद्र देवरे यांनी दिली. उरण येथील ओएनजीसी प्रकल्पातील एकही कामगार संघटना संपात सहभागी झाली नाही. त्यामुळे प्रकल्पातील कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मुख्य प्रकल्प अधिकारी एस. के. साहू यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Composite Composite response in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.