‘त्या’ पुलाच्या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमा!
By Admin | Updated: December 8, 2014 23:53 IST2014-12-08T23:53:04+5:302014-12-08T23:53:04+5:30
तडे गेल्यामुळे आता या कामाची शासकीय समिती नेमून चौकशी करावी व त्यात आढळणा:या दोषींवर कारवाई करावी,

‘त्या’ पुलाच्या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमा!
ठाणो : घोडबंदरवरून मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरू होण्यापूर्वीच तडे गेल्यामुळे आता या कामाची शासकीय समिती नेमून चौकशी करावी व त्यात आढळणा:या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या उड्डाणपुलाचे काम मागील नऊ वर्षापासून सुरू असून त्यासाठी पाचपटीने खर्च करीत असताना अतिशय संथगतीने काम सुरू आहे. या कामास आघाडी सरकारचे मंत्री व अधिकारी जबाबदार असून काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीचे अधिकारी करीत असले तरी सद्य:स्थितीत या पुलाचे काम अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा पूल खुला होण्यापूर्वीच त्याला तडे गेले आहेत. परंतु, एमएसआरडीसीचे अधिकारी या पुलामध्ये हायटेंशन वायर टाकत असताना त्याला असलेली प्रिसीव्हिंग वायर तुटली असल्याचा दावा करीत आहेत.
प्रत्यक्षात या उड्डाणपुलाचे काम तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण झाले नसून अतिशय निकृष्ट पद्धतीने या पुलाचे काम झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनस्तरावर समिती नेमण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. ती पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
4घोडबंदर येथील रस्ता वाढणा:या वाहनांसाठी अपुरा पडत असल्याने घोडबंदर ते मीरा रोड या दरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरण करून या रस्त्यासोबतच नवीन एलेव्हेटेड रस्ता अथवा भुयारी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
4या उड्डाणपुलाचे काम मागील नऊ वर्षापासून सुरू असून त्याचा खर्च पाचपटीने वाढला असूनही त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. तरीही काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसीचे अधिकारी करीत आहेत.