महानगरपालिका स्थापनेसाठी समिती
By Admin | Updated: November 28, 2015 01:32 IST2015-11-28T01:32:25+5:302015-11-28T01:32:25+5:30
पनवेल महानगरपालिका होण्याची गरज लक्षात घेऊन शासन स्तरावर विशेष प्रयत्न होऊ लागले आहेत. शासनाने यासाठी समति स्थापन केली

महानगरपालिका स्थापनेसाठी समिती
पनवेल : पनवेल महानगरपालिका होण्याची गरज लक्षात घेऊन शासन स्तरावर विशेष प्रयत्न होऊ लागले आहेत. शासनाने यासाठी समति स्थापन केली असून ही समति अभ्यास करून शासनास शिफारस करणार आहे. तर पनवेल नगर परिषदेने देखील आजूबाजूच्या ग्रामपंचायतीकडून विविध विषयांची माहिती मागितली असून एका महिन्यात ही माहिती जमा करून ती माहित शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
पनवेल नगरपालिका ९०० हेक्टर क्षेत्रात विस्तारली आहे. त्यापैकी जवळपास साडे पाचशे हेक्टर जागा सिडको क्षेत्रात येते. ३६३ हेक्टरचे पनवेल शहर पालिकेकडे आहे. २५वर्षांपूर्वी पनवेलला महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार १९९० साली शासनाने अधिसूचनाही जारी केली होती तर १९८७ साली नगरविकास विभागाने सर्व्हे करून प्रस्ताव तयार केला. सिडको वसाहतीमध्ये रस्ते, उद्याने, पाणी, विरंगुळा केंद्रे, कचरा व्यवस्थापन या सर्व बाबींचा बोजवारा उडाला आहे. नियोजन प्राधिकरणाची गरज आहे. त्यासाठी महापालिका हा योग्य पर्याय आहे. राज्य सरकारने पनवेल, कामोठे,खारघर,कळंबोली , तळोजा औद्योगिक वसाहत अशी विस्तृत विभागाची महानगरपालिका स्थापन करावी अशी मागणी पुढे आली होती.