उद्यानाला वीजपुरवठ्यासाठी आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:35 IST2017-08-02T02:35:41+5:302017-08-02T02:35:41+5:30
शहरातील प्रभाग ४ येथील सेक्टर १९ मधील उद्यानात वीजपुरवठा तत्काळ देण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल,

उद्यानाला वीजपुरवठ्यासाठी आयुक्तांना साकडे
पनवेल : शहरातील प्रभाग ४ येथील सेक्टर १९ मधील उद्यानात वीजपुरवठा तत्काळ देण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल, असा इशारा शाश्वत फाउंडेशनच्या अध्यक्षा बिना गोगरी यांनी पनवेल महापालिका व सिडको प्रशासनाला दिला आहे.
खारघरमधील सेक्टर १९ अंतर्गत असणाºया भूखंड क्र. ४३ वरील उद्यानात अद्यापही वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. उद्यानात पाण्याची व्यवस्थाही नाही. स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी वापरात नाही. त्यामुळे याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी व खेळण्यासाठी येणाºया ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची गैरसोय होते. वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने संध्याकाळनंतर उद्यानात अंधाराचे साम्राज्य असल्याने गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यानात वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी गोगरी यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली.