प्रदूषित रासायनांनी कोलवडेची शेती नापिक

By Admin | Updated: December 10, 2014 22:39 IST2014-12-10T22:39:50+5:302014-12-10T22:39:50+5:30

तारापुर एमआयडीसीतील उद्योगांमधून निघणारी प्रदूषित रसायने व घातक पाणी प्रक्रिया न करताच ते कोलवडे गावातील नैसर्गिक नाल्यावाटे गेली अनेक वर्षे सोडले जाते.

Colloquium farming NPIC by polluted chemicals | प्रदूषित रासायनांनी कोलवडेची शेती नापिक

प्रदूषित रासायनांनी कोलवडेची शेती नापिक

बोईसर : तारापुर एमआयडीसीतील उद्योगांमधून निघणारी प्रदूषित रसायने व घातक पाणी प्रक्रिया न करताच ते कोलवडे गावातील नैसर्गिक नाल्यावाटे गेली अनेक वर्षे सोडले जाते. परंतु आता साचलेला गाळ व नाल्यांची कमी झालेल्या रूंदीमुळे ही रसायने व प्रदुषीत सांडपाणी कोलवडे गावातील शेतजमीन पसरून ती नापीक होऊ लागली आहे. शेतक:यांचे होणारे नुकसान त्वरीत थांबविण्याकरीता नाल्यातील गाळ काढून नाले रूंदीकरण न केल्यास आम्ही सांडपाण्याच्या नाल्याच्या मुख्यद्वारावर बांधकाम करून ते नालेच बंद करू असा इशारा पर्यावरण दक्षता मंचाने दिला असून या आंदोलनाला पाठींबा देण्याचा ठरावा कोलवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
पर्यावरण दक्षता मंचचे तारापूर विभागाचे अध्यक्ष मनिष संखे यांनी तारापुर एनव्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटीला (टीईपीएस) दिलेल्या आंदेालनाच्या इशारापत्रत तारापूर एमआयडीसी मधील अपु:या सामुदायीक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे (सीईटीपी) वाढते. रासायनिक पाण्याचे प्रदुषण व अनधिकृतरीत्या सोडले जात असलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे कोलवडे गावातील तीन पोट व एक मुख्य नैसर्गिक नाला (मोरीखाडी) चे पात्र अरूंद झाल्याने तसेच प्रदुषीत गाळ मोठय़ा प्रमाणात साचल्याने सांडपाणी शेतजमीनीत पसरत असून शेतजमीनी नापीक होत आहेत. याची दखल घेऊन नैसर्गिक नाले साफ करून त्यांची खोली व रूंदी वाढवावी अन्यथा पर्यावरण दक्षता मंच व कोलवडे ग्रामपंचायत व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ नालेच बंद करतील असा इशारा मनिष संखे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)
 
4नाल्यातील गाळ काढून खोली व रुंदी वाढविण्याची मागणी
4तीन पोट तर एक मुख्य नैसर्गिक नाल्याचे पात्र झाले अरूंद
4नाल्यात गाळ साचल्याने सांडपाण्याच्या प्रवाहाला अडथळा
4पाणी पसरते शेतजमीनीत
4शेतजमीनी झाल्या नापीक 
4कोलवडे गावाची दुरावस्था
4प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त
4कोलवडेच्या ग्रामसभेत आंदोलनाला पाठींब्याचा ठराव

 

Web Title: Colloquium farming NPIC by polluted chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.