कॉलेजची चूक विद्याथ्र्याना भोवली
By Admin | Updated: December 12, 2014 02:14 IST2014-12-12T02:14:52+5:302014-12-12T02:14:52+5:30
दोन विद्याथ्र्याचे आंतरीक गुण (इंटर्नल मार्क्स) महाविद्यालयाने विद्यापीठाला न कळविल्याने त्यांच्या माथी फुकटच नापासाचा शिक्का बसला आहे.

कॉलेजची चूक विद्याथ्र्याना भोवली
पालघर : पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बीकॉमच्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्याथ्र्याचे आंतरीक गुण (इंटर्नल मार्क्स) महाविद्यालयाने विद्यापीठाला न कळविल्याने त्यांच्या माथी फुकटच नापासाचा शिक्का बसला आहे. महाविद्यालयाने उशीराने दंड भरल्यानंतर त्यांच्या हाती पास झाल्याचे सर्टीफिकेट पडले असले तरी महाविद्यालयाच्या अक्षम्य चुकीमुळे त्या विद्याथ्र्याच्या आयुष्यातील वाया गेलेल्या बहुमुल्य अशा एका वर्षासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
पालघर दांडेकर महाविद्यालयात बी.कॉमच्या वर्गात शिक त असलेले हितेश विश्वास अधिकारी आणि विलास शिंदे यांनी परिक्षा दिल्यानंतर निकाल घोषीत झाल्यानंतर आपण नापास झाल्याचा निकाल त्यांच्या हाती पडल. आपण पास होणार असल्याचा त्यांना पुर्ण विश्वास असताना नापास झाल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. हितेशने आपली गुणपत्रीका पाहिल्यानंतर मॅनेजमेंट अकाऊंटींग या विषयाच्या लेखी परीक्षेत 36 गुण मिळाल्याचे दर्शवीत महाविद्यालयातील आंतरीक गुणाची लेखी परीक्षा देऊनही आपण त्या परिक्षेत गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले हेाते तर विलास शिंदे या सर्व विषयात पास झाला असताना कॉम्प्युटर सिस्टीम अँड अॅप्लीकेशन या विषयासाठी महाविद्यालयाकडून दिले जाणारे आंतरीक गुण वेळीच विद्यापीठाला कळविले नसल्याने या अक्षम्य चुकीचा फटका या विद्याथ्र्याना बसला. त्याच्याही गुणपत्रीकेतही आंतरीक गुणाच्या परिक्षेत गैरहजार असल्याचे चुकीने नमुद करण्यात आले होते.आपण पास होऊनही महाविद्यालयाच्या चुकीमुळे आपल्यावर नापासाच्या शिक्का बसल्याने हवालदिल झालेल्या विद्याथ्र्यासह त्यांच्या पालकांनी महाविद्यालयाला कळविले.