प्रभाग ६ मध्ये आचारसंहिता सुरू
By Admin | Updated: March 12, 2016 02:19 IST2016-03-12T02:19:20+5:302016-03-12T02:19:20+5:30
महापालिका प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता यादव यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे.

प्रभाग ६ मध्ये आचारसंहिता सुरू
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता यादव यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे.
ओबीसीसाठी राखीव असलेल्या या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने संगीता राजबली यादव यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक अर्ज भरताना यादव यांनी ओबीसी असल्याचे जातप्रमाणपत्र सादर केले होते. सामाजिक कार्यकर्ते दुर्गाविजय रामनाथ पाल यांनी माहितीच्या अधिकाराखाली मुंबई जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये विचारणा केली होती.
सदर कार्यालयाने आम्ही अशाप्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले होते. जात पडताळणी समिती बांद्रा यांनीही जातप्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट केले असल्याचा दाखला १४ जानेवारीला दिला आहे. यामुळे यादव यांना अपात्र ठरविण्यात आले.
सदर प्रभागामध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ११ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामअशिष यादव यांचा बालेकिल्ला असणाऱ्या या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)