खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 5, 2024 17:25 IST2024-05-05T17:25:27+5:302024-05-05T17:25:51+5:30
कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.

खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. खारघर सेक्टर ३५ परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी निरीक्षक अतुल आहेर, सहायक निरीक्षक यमगर यांच्या पथकामार्फत शुक्रवारी रात्री सापळा रचला होता.
त्यामध्ये एका विदेशी नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याकडे २२ ग्रॅम कोकेन मिळून आले. बाजारभावानुसार २ लाख २० हजार रुपये त्याची किंमत आहे. याप्रकरणी मव्हनयुकी मुस्सा (५०) याला अटक केली असून तो मूळचा टांझानियाचा आहे. खारघर परिसरात तो रहायला असून अमली पदार्थ तस्करीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.