शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंदा म्हात्रे यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:49 IST

गावठाणांच्या प्रश्नांवर चर्चा : समाज माध्यमांत तर्कवितर्क सुरू

नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बेलापूर मतदारसंघामध्ये गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. परंतु म्हात्रे यांनी आम्ही गावठाण विस्तारासाठीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाल्यापासून नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. शहरातील दोनही मतदारसंघामध्ये नाईक परिवाराला उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. यामुळे शिवसेनेमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनेने दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास विरोध केला आहे.बेलापूर मतदारसंघावर दावा केला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.

बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईकांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. समाजमाध्यमांवरून याविषयी उलटसुलट चर्चाही सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी माहिती घेण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीमध्ये कोणताही राजकीय मुद्दा नसल्याचे स्पष्ट केले.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आम्ही सोडविले आहेत. काही प्रश्न प्रलंबित असून तेही लवकर सोडविले जावे यासाठी ही भेट घेतली होती. गावठाण विस्तारासाठीचा अध्यादेश लवकर करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. यासाठीच भेट घेतली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. गावठाण विस्ताराच्या प्रश सोडविण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. या बैठकीला पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राजेश पाटील, दत्ता घंगाळे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेक प्रश्न सोडविले असून उर्वरित प्रश्न लवकर सोडविण्यासाठी आम्ही सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नव्हता.- मंदा म्हात्रे, आमदार बेलापूर

टॅग्स :BJPभाजपाManda Mhatreमंदा म्हात्रेGanesh Naikगणेश नाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस