मंगळवारी सहा तास पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:56+5:302016-04-03T03:51:56+5:30
महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीची भोकरपाडा सबस्टेशन येथील देखभाल व दुरु स्तीची कामे हाती घेण्यात

मंगळवारी सहा तास पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीची भोकरपाडा सबस्टेशन येथील देखभाल व दुरु स्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मंगळवार, ५ एप्रिल रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमार्फ त केल्या जाणाऱ्या या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असा सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.