शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंसह क्लार्कची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 07:41 IST

गुन्हे शाखेने केली होती अटक, पोलिसांनी या प्रकरणात बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज, शंकर पिंगळे यांचीही चौकशी केली आहे.

नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे व क्लार्क शिवनाथ वाघ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री त्यांना अटक केली होती.

एपीएमसी आवारातील शौचालयाच्या ठेक्यात झालेल्या साडेसात कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी काहींना अटक केली होती.

शशिकांत शिंदे यांचेही नाव तपासाला अधिक गती देऊन मंगळवारी रात्री संजय पानसरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, चौकशीअंती त्यांना अटक केली होती. त्याशिवाय एपीएमसीचे क्लार्क शिवनाथ वाघ यांनाही यावेळी अटक केली होती. दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पानसरे यांना झालेली अटक व या प्रकरणात बाजार समितीचे इतरही काही जण व सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचेही नाव या प्रकरणात गुंतले गेलेले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज, शंकर पिंगळे यांचीही चौकशी केली आहे.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती