स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: October 3, 2015 02:34 IST2015-10-03T02:34:09+5:302015-10-03T02:34:09+5:30
‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
नवी मुंबई : ‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी हातात झाडू घेऊन शाळेबाहेरील सर्व परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाशीतील सेक्टर १६ येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, यासाठी शाळेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
नवी मुंबई शहराला मानाचा तुरा मिळवून देणाऱ्या स्मार्ट शहराचे मानांकन आणखीन उंचाविण्यासाठी शहर स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांनी केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे केनेडी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होते. सामूहिक शपथ
पनवेल : गांधी जयंतीनिमित्ताने पनवेल नगरपरिषदेने शहरात स्वच्छता रॅली काढली. रॅलीत काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचा पेहराव परिधान केला होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी सामूहिक शपथ घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. काही तरु णांनी पथनाट्य देखील सादर केले.