श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ
By वैभव गायकर | Updated: October 2, 2022 10:37 IST2022-10-02T10:30:37+5:302022-10-02T10:37:48+5:30
उपजिल्हा रुग्णालयातील पंखे,भींती,लाद्या स्वतःच्या हाताने केले स्वच्छ

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ
वैभव गायकर
पनवेल: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा l तर्फे पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.2 रोजी पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.सकाळी 7 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली.यावेळी रुग्नालयातील पंखे,भींती,लाद्या तसेच आजूबाजूचा परिसर श्री सदस्यांनी स्वतःच्या हाताने स्वच्छ केला.
पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयाचे नाव महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आहे.जवळपास 500 श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.याकरिता प्रतिष्ठान तर्फे , साफसफाईसाठी लागणारे सर्व साहित्य या श्री सदस्यांना पुरविण्यात आले होते.डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात.यामध्ये स्वच्छ्ता अभियान , वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन , रक्त दान शिबिर , जल पुनर्भरण , प्रौढ साक्षरता अभियान आदींचा समावेश आहे.