एक धाव स्वच्छतेसाठी
By Admin | Updated: August 12, 2016 02:31 IST2016-08-12T02:31:58+5:302016-08-12T02:31:58+5:30
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मिनी मॅरेथॉनचे १४ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता आयोजन केले आहे

एक धाव स्वच्छतेसाठी
कळंबोली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मिनी मॅरेथॉनचे १४ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता आयोजन केले आहे. या मॅरेथॉनचे लोकमत माध्यम प्रायोजक आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या देशात स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. स्थानिक पातळीवर स्वच्छतेचा जागर व्हावा याकरिता साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.
स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनला रविवारी सकाळी ७ वाजता करवली चौकात सुरूवात होणार आहे, ती रोडपाली येथील पल्लवी हॉटेलपर्यंत जाईल. तेथून वळण घेवून पुन्हा करवली चौकात सांगता होणार आहे. एकूण तीन कि.मी. अंतराची ही धाव असणार आहे. ८ ते १२ आणि १३ वर्षांपुढील खुला गट त्याचबरोबर अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता स्वतंत्र गट असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, प्रशस्तिपत्रक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षीस सुध्दा देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता संस्थेचे संस्थापक नितीन काळे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, वीरेंद्र पाटील, गणेश कारंडे, जितेश कुडाळकर, दत्ता ठाकूर, हेमंत हिरे यांच्यासह स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. या मॅरेथॉनकरिता शाळा- महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)