बेलापूरमध्ये विसर्जनस्थळी दोन गटात हाणामारी; गाडीला धक्का लागल्याने झाला वाद, गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 7, 2022 19:42 IST2022-09-07T19:41:53+5:302022-09-07T19:42:00+5:30
याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापूरमध्ये विसर्जनस्थळी दोन गटात हाणामारी; गाडीला धक्का लागल्याने झाला वाद, गुन्हा दाखल
नवी मुंबई : अरुंद जागेत दोन गाड्या एकमेकांना घासल्याने झालेल्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाणीत दोन्ही गटाच्या व्यक्ती जखमी झाल्या असून या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
मंगळवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास बेलापूर गावातील विसर्जन तलावालगत हि घटना घडली आहे. त्याठिकाणी वेदांत कोळी याचे कुटुंब कारमधून गणपती विसर्जनासाठी आले होते. विसर्जन करून ते परत घराकडे जात यातना ज्ञानेश्वर कोळी यांची दुचाकी कारच्या समोर आली. यावेळी दोन्ही वाहने एकमेकांना घासली. त्यावरून दोन्ही गटामध्ये वाद झाला असता त्यातून हाणामारी झाली. यामद्ये दोन्ही गटातल्या व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.