जिओ फोरजी लाईनच्या खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 08:55 PM2019-12-11T20:55:52+5:302019-12-11T20:55:57+5:30

खारघर सेक्टर १०मध्ये जिओ फोरजी लाईनचे काम सुरू आहे.

CIDCO's waterway broke while digging for the Geo Fourji line; Thousands of liters of water wasted | जिओ फोरजी लाईनच्या खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

जिओ फोरजी लाईनच्या खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडली; हजारो लिटर पाण्याची नासाडी

Next

पनवेल : खारघर सेक्टर १०मध्ये जिओ फोरजी लाईनचे काम सुरू आहे. खोदकाम करताना येथील तुलसी कमल बिल्डिंगसमोर सिडकोची जलवाहिनी खोदकाम करताना फोडल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे. खोदकाम करताना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला विश्वासात न घेता हे खोदकाम केल्याने हा प्रकार घडला. यावेळी सुमारे तासभर जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर वाहत होते. खारघर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू आहे. येथील रहिवाशांनी मागील महिन्यातच अपुऱ्या पाण्याअभावी  सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मात्र बेजबाबदारपणे खोदकाम करताना सिडकोची जलवाहिनी तोडल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने याचा परिणाम सेक्टर १० मधील पाणीपुरवठ्यावर झाल्याने संध्याकाळी येथील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे तुलसी कमल बिल्डिंगमधील रहिवासी सुरेश ठाकूर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुमित मोरवाल यांनी घटनास्थळी पाहणी केली. संबंधित बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कंत्राटदावर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकार घडल्यावर खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी गजानन दलाल यांना विचारणा केली असता संबंधित काम स्थगित ठेवण्याचे आदेश जिओ फोरजीच्या कंत्राटदाराला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: CIDCO's waterway broke while digging for the Geo Fourji line; Thousands of liters of water wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.