शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

सिडकोच्या स्मार्ट सिटीमधील योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 06:07 IST

३३ मैदानांचे आश्वासन : पनवेल परिसरामध्ये ७३ उद्याने उभारण्याची केली होती घोषणा; कोट्यवधींच्या निधीची तरतूद

नामदेव मोरे

नवी मुंबई : सिडकोने डिसेंबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्मार्ट दक्षिण नवी मुंबईची (पनवेल परिसर) घोषणा केली होती. ५३ हजार २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक या परिसरात होणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०१७ पर्यंत ६५ कोटी रुपये खर्च करून या परिसरात ३३ सुसज्ज मैदाने व तब्बल ७३ उद्याने बनविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात बहुतांश सर्व योजना कागदावरच राहिल्या आहेत.केंद्र शासनाने स्मार्ट सिटीची संकल्पना जाहीर करताच सिडकोने अत्यंत घाई गडबडीमध्ये आम्हीच पहिली स्मार्ट सिटी उभारणार असल्याची घोषणा केली.

पनवेल व नैना परिसरात भविष्यात होणारे प्रकल्प व सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती पुस्तिका तयार करून व प्रकल्पांचे मॉडेल तयार करून ४ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्मार्ट दक्षिण नवी मुंबईची घोषणा करून टाकली. या परिसरामध्ये तब्बल ५३ हजार २४४ कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ३२ पानांच्या स्मार्ट सिटी अहवालामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची नावे, त्यावर होणारा खर्च आणि प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण केला जाणार याची माहिती दिली होती. सिडकोचे प्रदर्शन व माहिती पुस्तिका पाहून पनवेलच पहिली स्मार्ट सिटी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु तीन वर्षे पूर्ण होत आल्यानंतरही प्रत्यक्षात या परिसराच्या विकासासाठी अत्यावश्यक सुविधाही देण्यात अपयश आले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये २०१७ अखेरपर्यंत ७३ उद्याने व ३३ मैदाने विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. या घोषणेमुळे खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उलवे, करंजाडे, नवीन पनवेल, द्रोणागिरी परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिडकोने हे नोड विकसित केले; परंतु नागरिकांच्या सुविधेसाठी मैदाने व उद्याने विकसित केली नव्हती. खारघरमध्ये एकमेव सेंट्रल पार्क हे भव्य उद्यान विकसित केले; परंतु त्याचीही देखभाल करणे शक्य झाले नाही. उर्वरित परिसरामध्ये एकही चांगले उद्यान नाही. यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी काहीही पर्याय उपलब्ध नव्हता. स्मार्ट सिटीतील घोषणेप्रमाणे उद्याने व मैदाने विकसित झाली असती तर या परिसरातील विकासाचा बॅकलॉग भरून निघाला असता; परंतु प्रत्यक्षात ८ ते १० उद्यानेच तयार करण्यात आली आहेत. यामध्येही लक्ष वेधले जाईल असे एकही उद्यान नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल २००पेक्षा जास्त उद्याने तयार केली आहेत; परंतु सिडकोकडे प्रचंड पैसे असतानाही त्यांनी या सुविधेकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.उद्यानांसह मैदाने हवीचशहराची निर्मिती म्हणजे फक्त इमारती नाहीत. नागरिकांना इतर सुविधांप्रमाणे मैदाने व उद्यानांचीही गरज असते. सिडकोने चांगली मैदाने विकसित करावी व उद्यानांची निर्मिती करून त्यांची देखभाल करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.शेकाप पाठपुरावा करणारखारघरमधील सेंट्रल पार्कच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर या वृत्ताचे पडसाद पनवेलमध्ये उमटले. सिडकोने नियोजनाप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवावे, अशी मागणी केली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनीही या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंट्रल पार्क नियोजनाप्रमाणे बनविण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले असून वेळ पडल्यास सह्यांची मोहीम व आंदोलनही केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.अध्यक्षांच्याभूमिकेकडे लक्षच्सिडकोच्या अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे पनवेलवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ठाकूर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील योजनांची अंमलबजावणी केली तरी पनवेल परिसराचा कायापालट होऊ शकतो. सिडकोने फक्त कागदावर ठेवलेल्या या योजना प्रत्यक्ष आणण्याचे आव्हान ठाकूर यांच्यासमोर असणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSmart Cityस्मार्ट सिटी