शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सिडकोच्या घरांकडे पोलिसांची पाठ, मुदत वाढवूनही प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:22 AM

‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला सुरुवातीच्या काळात पोलिसांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु मागील १५ दिवसांत पोलिसांनी या घरांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. कारण आतापर्यंत केवळ ३,९६२ अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी मुदत एक महिन्याने वाढवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आलेआहे.‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार, २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून १५ हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी २८ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. २९ आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. परंतु सिडकोने ही मुदत २९ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. असे असले तरी मागील १५ दिवसांत केवळ अडीचशे अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. मागील दीड महिन्यात ४,४६६ घरांसाठी केवळ ३,९६२ अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत.एकूणच सिडकोने खास पोलिसांसाठी गाजावाजा करीत जाहीर केलेल्या या घरांकडे पोलिसांनीच पाठ फिरविल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने १५ सप्टेंबर रोजी नियोेजित केलेली संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सध्या सिडकोच्या महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.खास पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ४,४६६ घरांपैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सेवा बजावणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको