खुटारीमधील गोडाऊनवर सिडकोची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:06 IST2019-09-26T23:06:27+5:302019-09-26T23:06:36+5:30

पनवेल : खारघरलगत खुटारी गावाजवळील अनधिकृत गोदामांवर सिडकोने गुरुवारी कारवाई केली. सिडकोच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेल्या या गोदामांना जमीनदोस्त करीत ...

CIDCO's action on Godown in Khotri | खुटारीमधील गोडाऊनवर सिडकोची कारवाई

खुटारीमधील गोडाऊनवर सिडकोची कारवाई

पनवेल : खारघरलगत खुटारी गावाजवळील अनधिकृत गोदामांवर सिडकोने गुरुवारी कारवाई केली. सिडकोच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेल्या या गोदामांना जमीनदोस्त करीत साहित्य जप्त केले.

खुटारी गावालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर ही गोदामे अनेक वर्षांपासून उभारण्यात आली होती. संबंधित भूखंडावर खासगी प्रकल्प उभे राहणार आहेत. याकरिता जागा रिकाम्या करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.

दहा ते पंधरा गोदामे या वेळी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने निष्कासित केली. जेसीबीच्या साहाय्याने ही गोदामे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी सिडकोच्या माध्यमातून जवळ ३० ते ४० कर्मचारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते. कारवाईला कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. खुटारी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे असून, अनेक वेळा या गोदामांमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे.

Web Title: CIDCO's action on Godown in Khotri

टॅग्स :cidcoसिडको