सॅप कार्यप्रणालीवर सिडकोत कार्यशाळा

By Admin | Updated: July 31, 2015 00:14 IST2015-07-31T00:14:38+5:302015-07-31T00:14:38+5:30

सिडकोने प्रशासकीय कामकाज प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॅप या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रणालीची सिडकोच्या सर्व विभागांतील अधिकारी

CIDCO workshop on SAP operating system | सॅप कार्यप्रणालीवर सिडकोत कार्यशाळा

सॅप कार्यप्रणालीवर सिडकोत कार्यशाळा

नवी मुंबई : सिडकोने प्रशासकीय कामकाज प्रक्रिया संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॅप या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रणालीची सिडकोच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने सॅप पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ४ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.
दैनंदिन कार्यपध्दतीत सुलभता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सिडकोत विविध संगणकीय प्रणालींचा अवलंब करण्यात येत आहे. याच अनुषंगाने विविध विभागांतील कामकाजाचे आॅटोमेशन करण्याच्या हेतूने लवकरच सॅप कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीची ओळख व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात सिडकोच्या सर्व विभागांतील प्रशासकीय कामकाजाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या सादरीकरणात दैनंदिन कार्यपध्दती, त्यातील अपेक्षित सुधारणा, यात सॅप प्रणालीचा कशाप्रकारे अवलंब करता येईल, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिडकोच्या सर्व विभागांच्या गरजा व अपेक्षा ध्यानात घेऊन सॅप प्रणालीची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. झेनसार या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. अंमलबजावणीसाठी प्रोजेक्ट इंटिग्रेटर म्हणून मे. अ‍ॅक्सेन्चुअर या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CIDCO workshop on SAP operating system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.