शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील सिग्नलची देखभाल सिडको करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 02:10 IST

पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कळंबोली ते खारघर दरम्यानच्या सर्व सिग्नलची देखभाल करण्यास सिडको तयार झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतराचा प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे मंगळवारी कामोठे उड्डाणपुलाखालील सिडकोने खासगी एजन्सीमार्फत सिग्नल यंत्रणेची तपासणी केली.पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सिग्नल यंत्रणा बसवली आहे; परंतु कामोठे उड्डाणपूल, तळोजा लिंक रोड, खारघर हिरानंदानी येथील यंत्रणा बंद अवस्थेत आहे. म्हणजे हे सिग्नल धूळखात पडून आहे. कामोठे लेफ्ट टर्नची एक मार्गिका तयार झाली आहे. त्यामुळे आता येथून मुंबईच्या दिशेने वाहने धावतात. त्याबरोबर मुंबईकडून येणारी वाहने पुलाखालून वसाहतीत जातात.कामोठे वसाहतीतून कळंबोली किंवा पनवेलकडे जाण्यासाठीही येथून जावे लागते. त्यामुळे कामोठे प्रवेशद्वारावर जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ मोठी असते. लहान-मोठे अपघातही घडतात. येथे असलेले सिग्नल बंद असल्याने वाहतूक सुरळीत होत नाही. हे सिग्नल पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी भाजपचे युवानेते सचिन गायकवाड यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही यंत्रणा सिडकोकडे हस्तांतरित करण्याकरिता पत्र दिले.याकरिता येणारा खर्च देण्यास तयार असल्याचेही त्या पत्रात म्हटले होते; परंतु सिडकोकड़ून याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नव्हती, त्यामुळे गायकवाड यांनी पुन्हा मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देत सिडकोने ही सेवा हस्तांतरित करून घेण्यास मान्यता दिली आहे.त्यानुसार मंगळवारी सिडकोने रिलॅबल या खासगी एजन्सीच्या मार्फत कामोठे सिग्नलची तपासणी करण्यात आली. ही संस्था तपासणी अहवालासह खर्चाचा तपशील सिडकोच्या विद्युत आणि मेट्रो विभागाला सादर करणार असल्याचे समजते.

टॅग्स :cidcoसिडकोhighwayमहामार्ग