शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सिडकोचा मेगा गृहप्रकल्प : घरांसाठी पहिल्याच दिवशी २,२१७ अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 02:39 IST

सिडकोच्या १४८३८ घरांसाठी स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्याच दिवशी २,२१७ ग्राहकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत.

नवी मुंबई - सिडकोच्या १४८३८ घरांसाठी स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्याच दिवशी २,२१७ ग्राहकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत. तर तीन दिवसांत १५,७७२ ग्राहकांनी सिडकोच्या संकेतस्थळावर घरासाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत तब्बल ३६८०० लोकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन योजनेची माहिती घेतली आहे.सिडकोने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची सोमवारी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. सोमवारी दुपारपासून वेबसाइट नोंदणीसाठी खुली करण्यात आली. पहिल्या दिवशी १४५८६ ग्राहकांनी वेबसाइटला भेट देऊन गृहयोजनेची माहिती घेतली होती. तर दुपारनंतर तब्बल ४४५० ग्राहकांनी नोंदणी केली होती. १५ आॅगस्टच्या दुपारपासून अर्ज स्वीकारण्याची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तब्बल २,२१७ ग्राहकांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी अगोदर पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत १५,७७२ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.सिडकोने यापूर्वी बांधलेल्या गृहप्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीपेक्षा या वेळी घरांच्या किमती दोन ते अडीच लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत. सर्वांसाठी घरे या धोरणानुसार या गृहप्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घराची किंमत १८ लाख तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घराची किमत २५ लाख रुपये इतकी आहे. शिवाय पंतप्रधान रोजगार आवास योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. त्यामुळेच या प्रकल्पातील घरांना विक्रमी प्रतिसाद मिळेल, असे सिडकोला वाटते.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे २८६२, खारघरमध्ये ६८४, कळंबोलीत ३२४, घणसोलीत ५२८ तर द्रोणागिरीत ८६४ सदनिका आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे ५,२३२, खारघर १२६0, कळंबोली येथे ५८२, घणसोलीमध्ये ९५४ तर द्रोणागिरीत १५४८ घरे आहेत. सर्वाधिक सदनिका तळोजा येथे बांधण्यात येत आहेत.

टॅग्स :Homeघरcidcoसिडको