शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:44 IST

दोन लाखांचा दर; तिजोरीत पडणार शंभर कोटींची भर

नवी मुंबई : घणसोली येथील सिडकोच्या भूखंडांना प्रतिचौरस मीटरला चक्क दोन लाख रुपयांचा दर प्राप्त झाला आहे. सिडकोने निवासी आणि वाणिज्य वापराच्या भूखंड विक्रीसाठी काढलेल्या निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत १०० कोटींची भर पडणार आहे.सिडकोच्या भूखंडांना विकासक आणि गुंतवणूकदारांची नेहमीच पसंती राहिली आहे, त्यामुळे सिडकोने मागील काही काळात उपलब्ध मोकळ्या भूखंडाचे टेडर काढून विकण्याचा सपाटा लावला होता. बोली पद्धतीने भूखंड विकल्याने किमतीत अनियंत्रित वाढ झाली. प्रतिचौरस मीटरला लाखोचा दर मिळू लागला. त्यामुळे भूखंडांच्या ट्रेडिंगला चालना मिळाली. त्यातून जमिनीचे दर आणखी वधारले. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांची घरे महागली. दोन वर्षांपूर्वी घणसोली येथील भूखंडाला प्रतिचौरस मीटरला दीड लाख रुपयांचा दर मिळाला होता. आजही हा दर कायम असल्याचे बुधवारी उघडण्यात आलेल्या निविदातून उघड झाले आहे. सिडकोने घणसोली येथील सात भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या; परंतु त्यातील तीन भूखंडाच्या निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार भूखंडांसाठी प्राप्त झालेल्या निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. त्यातील सेक्टर ५ येथील १०५५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला चक्क २ लाख ९ हजार ६५५ रुपयांचा दर मिळाला.टिटीन्म इन्फ्राकॉनने हा भूखंड घेतला आहे. या भूखंडाची सिडकोची मूळ किंमत प्रतिचौरस मीटरला ४२,९६६ रुपये इतकी होती. सेक्टर २ येथील १७५५ चौरस मीटरच्या भूखंडाला प्रतिचौरस मीटरला १५३९९९ रुपयांचा दर मिळाला. या भूखंडाची मूळ किंमत ४८८२५ रुपये इतकी होती. त्याचप्रमाणे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ९ या १७५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला प्रतिचौरस मीटरला १४७११२ रुपयांचा दर प्राप्त झाला. तर सेक्टर ६ येथील १७५० चौरस मीटरच्या भूखंडाला १४६११४ रुपयांचा दर मिळाला. हे दोन्ही भूखंड निलसिद्धी असोसिएटने विकत घेतले आहेत. या भूखंडांची मूळ किंमत प्रतिचौरस मीटरला ४२९९९ रुपये इतकी होती.पणन विभागाने घणसोलीतील सात भूखंडांसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु यातील तीन भूखंडांची यापूर्वीच विक्री झाली होती. संबंधित भूधारक आणि सिडको यांच्यात या भूखंडांवरून वाद सुरू आहे. हा वाद मिटण्यापूर्वीच पणन विभागाने हे भूखंड पुन्हा विक्रीला काढला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या निवदा प्रक्रियेतून सदर तीन भूखंड वगळ्यात आले.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई