शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोचा धडाका; आठ दिवसांत अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:37 AM

पावसाळा आणि त्यानंतर आलेल्या सण-उत्सवामुळे शिथिल झालेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा तीव्र केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २0१५ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

नवी मुंबई : पावसाळा आणि त्यानंतर आलेल्या सण-उत्सवामुळे शिथिल झालेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा तीव्र केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २0१५ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तसेच दिवसाआड उभारणाºया अतिक्रमणांवरही नियमित कारवाई केली जात आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबई महापालिका क्षेत्रासह दक्षिण नवी मुंबईतील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याभरात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.बेकायदा बांधकामांचा विषय गंभीर बनला आहे. दिवसाआड उभारल्या जाणाºया बेकायदा बांधकामांचे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे. राज्य सरकारने २0१५ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे नवीन बांधकामे उभारली जाणार नाहीत, यादृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. उलवे येथील पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी आरक्षित असलेल्या एका मोठ्या भूखंडावरील बेकायदा कंटेनर यार्ड चार दिवसांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर कामोठे परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ आणि मोकळ्या जागेवर बस्तान ठोकून असलेल्या फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यात आले. तर मंगळवारी गोठीवली येथील सुरू असलेल्या एका बांधकामावर हातोडा मारण्यात आला. तसेच यावेळी रबोळे स्थानकाच्या परिसरातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवरही कारवाई करण्यात आली. बुधवारी उलवे परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत कोपर-गव्हाण सेक्टर ९ व बामण डोंगरीच्या सेक्टर १८ मधील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला. परंतु कडेकोट पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) डी.के.जोगी, सहायक नियंत्रक एस.आर.राठोड आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तर उत्तर नवी मुंबईत नियंत्रक पी.बी.राजपूत, सहायक नियंत्रक गणेश झिने यांनी कारवाई मोहीम राबविली. दोन्ही विभागातील या कारवाई मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आले.सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. अत्यावश्यक साधनसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे कारवाई करताना या विभागासमोर अडचणी निर्माण होत आहेत. असे असले तरी उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर या विभागाने अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. बेकायदा बांधकामाबरोबरच अनधिकृत धार्मिक स्थळे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आदीवर कारवाई नियोजित करण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या महिन्यात ही मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. या मोहिमेला बांधकामधारकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी बेकायदा इमारतीतील घरे विकत घेवू नयेत, असे आवाहन अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक पी.बी.राजपूत यांनी केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको