शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

शहरात चायनीजचे पेव, मद्यपानालाही मुभा; पहाटेपर्यंत रंगत आहेत दारूच्या पार्ट्या 

By सूर्यकांत वाघमारे | Published: February 20, 2024 10:23 PM

शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या चायनीज सेंटरच्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगत आहेत.

नवी मुंबई : महापालिका व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे पेव सुटले आहे. त्याठिकाणी मद्यपानाला मुभा दिली जात असल्याने पहाटेपर्यंत दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांचाही रात्रभर वावर होत आहे. 

शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या चायनीज सेंटरच्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. काही ठिकाणी चायनीज सेंटर चालकच दारू उपलब्ध करून देत आहेत. तर काही ठिकाणी सोबत आणलेली दारू पिण्याची मुभा दिली जात आहे. वाशी, घणसोली, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणी मोकळ्या भूखंडावर चायनीज सेंटर चालवले जात आहेत. त्याठिकाणी ग्राहकांना मद्यपानास मुभा दिली जात असल्याने बार प्रमाणेच त्याठिकाणी तळीरामांची गर्दी जमत आहे. यावरून केवळ मद्यपानासाठी चायनीज सेंटर चालत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मात्र उघडपणे मद्यपान, मद्यविक्री चालत असतानाही उत्पादनशुल्क विभागाच्या नजरेस हे चित्र पडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर मोकळे भूखंड अवैध व्यवसायासाठी हडपले जात असल्याने पालिका, सिडको यांचेही त्याकडे होणारे दुर्लक्ष अर्थपूर्ण संबंधाची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच स्थानिक पोलिसही त्याकडे कानाडोळा करत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. घणसोली येथे पालिकेचे काही अधिकारीच दलालीच्या बैठकांसाठी चायनीज सेंटरचा आश्रय घेत असल्याची चर्चा आहे. तर सीबीडी बेलापूर येथे खाडीकिनारी चायनीज सेंटरच्या आडून जणू बारच चालवला जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. परिणामी अशा ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तळीरामांची ये जा सुरु राहत आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चायनीज सेंटर, भुर्जी पावच्या गाड्या याठिकाणी हाणामारीच्या, गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या आहेत. तर नेरूळच्या एका चायनीज सेंटरवर आश्रयासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही प्रकार घडला आहे. त्यानंतरही उघडपणे चायनीज सेंटर व तिथल्या मद्यपानाला मुभा मिळत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhotelहॉटेल