बालकाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 2, 2017 03:30 IST2017-06-02T03:30:47+5:302017-06-02T03:30:47+5:30
अलिबागमधील तळकरनगर येथील तीन मुले पोहण्यासाठी गुरुवारी शहरातील न्यायालयाच्या मागे असलेल्या समुद्रात गेली होती. पाण्याचा

बालकाचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : अलिबागमधील तळकरनगर येथील तीन मुले पोहण्यासाठी गुरुवारी शहरातील न्यायालयाच्या मागे असलेल्या समुद्रात गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांपैकी एका आठ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले.
ही मुले पोहण्यास गेल्यावर भरतीच्या पाण्याचा प्रवाह वाढत गेला. या मुलांपैकी साहिल सायगावकरला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. काही वेळातच तो पाण्यात बुडाला. पोहायला जात असल्याबद्दल कोणतीही कल्पना या तीन मुलांनी आपल्या घरच्यांना दिली नव्हती. बराच वेळ ही मुले घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोघ सुरू केली.
समुद्रावर पोहोचले असता साहिल त्याच्या घरच्यांना पाण्यात तरंगताना दिसला. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.