अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला

By Admin | Updated: June 25, 2016 02:07 IST2016-06-25T02:07:28+5:302016-06-25T02:07:28+5:30

भरधाव टँकर पलटी होवून अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी खाडी पुलावर घडली. अपघातानंतर टँकरने पेट घेतल्यामुळे सायन-पनवेल मार्गावर

The chemical tanker burns due to the accident | अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला

अपघातामुळे रसायनाचा टँकर पेटला

नवी मुंबई : भरधाव टँकर पलटी होवून अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी खाडी पुलावर घडली. अपघातानंतर टँकरने पेट घेतल्यामुळे सायन-पनवेल मार्गावर गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अखेर वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून वेळीच केमिकलच्या टँकरला लागलेली आग विझवली.
सायन-पनवेल मार्गावर वाशी खाडी पुलावर गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. चेंबूरवरून आंध्रप्रदेशकडे जाणारा भरधाव टँकर दुभाजकाला घासून मार्गावर पलटी झाला. यावेळी टँकरमध्ये मिथेनलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. अपघातानंतर काही क्षणातच टँकरने पेट घेतला. रासायनिक द्रवामुळे टँकरचा स्फोट होवून गंभीर दुर्घटनेची शक्यता त्याठिकाणी निर्माण झाल्याने खाडी पुलावरून वाशीकडे येणारी वाहतूक काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती. शिवाय आगीमुळे टँकरचा स्फोट झाल्यास पुलाला हानी पोचण्याची शक्यता होती. अपघाताची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर टँकरची आग विझून संभाव्य मोठी दुर्घटना टळली. टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार टँकरचालक सुनील यादव (३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.

 

Web Title: The chemical tanker burns due to the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.