एमबीबीएसला प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक

By Admin | Updated: June 2, 2017 06:00 IST2017-06-02T06:00:51+5:302017-06-02T06:00:51+5:30

नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी

Cheating with the excuse of access to MBBS | एमबीबीएसला प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक

एमबीबीएसला प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. २० लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सागर तानाजी लोहोट व निखिल कटमनी यांचा समावेश आहे. लोहोट याचे पामबीच रोडवरील एनआरआय कॉप्लेक्समध्ये श्री गणेशाय कन्सल्टन्सी असून दुसरा आरोपी गोवा येथे राहणारा आहे. या दोघांनी श्यामसुंदर प्रमोदकुमार गुप्ता याचा भाऊ सुरजकुमार गुप्ता याला एमबीबीएससाठी नामांकित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी संबंधितांकडून २० लाख ९५ हजार रुपये घेतले होते; परंतु प्रत्यक्षात प्रवेश मिळवून दिला नाही. या प्रकरणी संबंधितांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेताना या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना उपआयुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना दिल्या होत्या. या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत व स्वप्निल वाघमारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे सागर लोहोट याचा शोध घेतला व बुधवारी सीबीडीमध्ये त्याला अटक केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अजूनही काही मुलांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Cheating with the excuse of access to MBBS