पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक
By Admin | Updated: February 17, 2017 02:18 IST2017-02-17T02:18:45+5:302017-02-17T02:18:45+5:30
नवीन पनवेल येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पंपावरील कर्मचाऱ्यांकडून कमी पेट्रोल देण्यात येत असल्याची तक्रार

पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक
पनवेल : नवीन पनवेल येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पंपावरील कर्मचाऱ्यांकडून कमी पेट्रोल देण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील चालकांनी केली आहे.
नवीन पनवेल सेक्टर १२ मधील गणराज पेट्रोल पंपावर एका ग्राहकाला याचा अनुभव आला आहे. १६ फेब्रुवारी रोजी गुरु नाथ तांबडे यांनी सकाळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला दोनशे रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले असता त्याने केवळ दोन लिटर पेट्रोल भरले. याबाबत तांबडे यांनी पेट्रोल पंपचालकाकडे जाब विचारला असता, त्यांनी कर्मचाऱ्याची कानउघडणी केली. दररोज हजारो गाड्या या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येतात. याबाबत तांबडे यांनी तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे.