वसई-विरारमध्ये लवकरच फेरीवाला झोन

By Admin | Updated: November 18, 2014 23:13 IST2014-11-18T23:13:52+5:302014-11-18T23:13:52+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिका झाल्यानंतर वसई रोड, विरार, नवघर - माणिकपूर, नालासोपारा ४ ही शहरे तसेच अन्य गावांमधील फेरीवाल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे

Chapman zone in Vasai-Virar soon | वसई-विरारमध्ये लवकरच फेरीवाला झोन

वसई-विरारमध्ये लवकरच फेरीवाला झोन

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका झाल्यानंतर वसई रोड, विरार, नवघर - माणिकपूर, नालासोपारा ४ ही शहरे तसेच अन्य गावांमधील फेरीवाल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या फेरीवाल्यांकडून मोक्याच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने चारही शहरात फेरीवाला झोन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ शहरातील फेरीवाल्यांचे सध्या सर्व्हेक्षण सुरू असून फेरीवाल्यांची एकुण संख्या कळल्यानंतर किती व कसे झोन निर्माण करायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chapman zone in Vasai-Virar soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.