ठाणो परिसरातील वाहतुकीत बदल
By Admin | Updated: October 19, 2014 01:31 IST2014-10-19T01:31:24+5:302014-10-19T01:31:24+5:30
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 19 ऑक्टोबर 2क्14 रोजी होणार आहे.

ठाणो परिसरातील वाहतुकीत बदल
ठाणो : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 19 ऑक्टोबर 2क्14 रोजी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणारे विविध उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वाहनांमुळे आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडीची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील वागळे इस्टेट, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
वागळे इस्टेट येथे रोड क्रमांक 22, चौक सर्कलपासून ते आयटीआय सर्कल या ठिकाणी, कैलासनगर चौक, शांतीनगरकडे जाणा:या टीएमटी बसेसह सर्व वाहनांना मुख्य रस्त्याने जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मॉडेला चेकनाका, रोड क्र. 16 ते रोड क्र. 22, चौक सर्कल येथून किसननगर क्र. 1 मार्गे शांतीनगर, कैलासनगरकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.
वागळे डेपोतून हनुमाननगरमार्गे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय सर्कल) या ठिकाणी रोड क्र. 22 कडे जाणा:या टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य रस्त्याने दुतर्फा जाण्यास प्रवेश बंदी राहणार आहे. त्याऐवजी वागळे आगार, डेपो येथून अण्णा भाऊ साठे चौक मार्गे रोड क्र. 22 मार्गे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
मच्छी मार्केट : सीपी तलावापासून ते आयटीआय सर्कल, कैलासनगर चौक, शांतीनगर चौकाकडे जाण्यास टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य दुतर्फा रस्त्याने जाण्यास प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : मच्छी मार्केट, सीपी तलाव येथून रोड क्र. 22 सर्कलमार्गे, किसननगर क्र. 1 मार्गे भटवाडीमार्गे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
डोंबिवली घरडा सर्कल : येथून खंबाळपाडा रोडमार्गे टाटा नाका बाजूस जाणा:या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथून तसेच टाटा नाका खंबाळपाडा रोडमार्गे घरडा सर्कल बाजूस येणा:या सर्व वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल चौक येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : टाटा नाका, खंबाळपाडा रोडमार्गे जाणारी मोठी वाहने मानपाडा हाय वे रोडने तर लहान वाहने बंदिश पॅलेस हॉटेल चौक येथून चोळेगाव, ठाकुर्लीमार्गे सोडण्यात येणार आहेत. घरडा सर्कल बाजूकडून खंबाळपाडा, टाटानगर बाजूस जाणारी वाहने घरडा सर्कल येथून पेंढरकर कॉलेज, सुयोग हॉटेलमार्गे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
डोंबिवली विको नाका : येथून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिरमार्गे बंदिश पॅलेस बाजूस जाणा:या सर्व वाहनांना एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून तसेच बंदिश पॅलेस हॉटेल बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर बाजूस जाणा:या वाहनांना बंदिश पॅलेस चौक येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : डोंबिवली विको नाका बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिर बाजूस जाणारी वाहने एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून वळून पेंढरकर कॉलेजमार्गे नेण्यात यावीत. टाटा नाका, बंदिश पॅलेस बाजूकडून सावित्रीबाई फुले नाटय़ मंदिर बाजूस जाणारी वाहने टाटा नाका, मानपाडा हाय वे रोड व हलकी वाहने बंदिश पॅलेस येथून चोळेगाव, ठाकुर्लीमार्गे नेण्यात यावीत.
भिवंडी राजनोली नाका : येथून कल्याण दुर्गाडीमार्गे शीळफाटय़ाकडे जाणा:या मोठय़ा वाहनांना दुर्गाडीर्पयत प्रवेश देण्यात आला आहे. दुर्गाडीपासून पुढे मात्र प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा पौर्णिमार्पयत जाऊन उजवीकडे वळून आहेर ऑटो, सिंधीगेट, सुभाष चौक, वालधुनी ब्रिज, आनंद दिघे उड्डाणपूलमार्गे उजवीकडे वळून तीसगाव नाका, सूचक नाकामार्गे शीळफाटय़ाकडे नेण्यास प्रवेश देण्यात आला आहे.