शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

फिफा सामन्यांदरम्यान वाहनतळाचे आव्हान, पोलिसांसह पालिकेची कसोटी : स्टेडियमपर्यंत विशेष बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:25 IST

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे ८ सामने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या क्रीडा रसिकांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिका व पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे ८ सामने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या क्रीडा रसिकांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिका व पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दोन्ही यंत्रणांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून नेरूळ, सीवूडसह खारघर परिसरामध्ये वाहनतळ उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वाहनतळापासून स्टेडियमपर्यंत विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने नवी मुंबईमध्ये होणार असून त्यानिमित्ताने विश्वभर शहराचा नावलौकिक होणार आहे. फुटबॉल सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस, डॉ. डी. वाय. पाटील समूह यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सुरवात केली आहे. राज्य शासनानेही सहकार्य करण्यास सुरवात केली आहे. ६ दिवसांमध्ये विश्वचषकाचे ८ सामने येथे होणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ४५ हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा, स्टेडियम व्यवस्थापन व इतर कर्मचारी धरून ५० हजारपेक्षा जास्त नागरिक प्रत्यक्ष मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत. देशाच्या कानाकोपºयातून येणाºया क्रीडाप्रेमींची खासगी वाहने कुठे उभी करायची हा सर्वात गंभीर प्रश्न स्टेडियम व्यवस्थापन, महापालिका व वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे. सायन - पनवेल महामार्गाला लागून स्टेडियम आहे. वाशी ते पनवेल दरम्यान नेरूळ मध्यवर्ती ठिकाणी आहे. महामार्गावरून येणारी नियमित वाहने व त्या दिवशी स्पर्धेसाठी येणारी वाहने यांचे योग्य नियोजन केले नाही तर वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्टेडियम परिसरामध्ये फक्त व्हीआयपी वाहनेच उभी करता येणार आहेत.वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका व पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मैदानापासून काही अंतरावर रहेजा उद्योग समूहाचा विस्तीर्ण भूखंड आहे. त्या भूखंडावर विशेष वाहनतळ उभारण्यात येणार असून २ हजारपेक्षा जास्त वाहने तेथे उभी करता येणार आहेत. याशिवाय नेरूळ सेक्टर ६ मधील श्री गणेश रामलीला मैदान, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, सीवूड ग्रँड मॉल व रेल्वे स्टेशनमधील वाहनतळावरही वाहने उभी करण्याची सोय करण्यात येणार आहे. उरण फाट्याजवळ हायटेंशनखालील विस्तीर्ण भूखंड सिडकोकडून वाहनतळासाठी मिळविण्यात आले आहेत. त्या भूखंडावरही वाहने मोठ्याप्रमाणात उभी करता येणार आहेत. याशिवाय पुणे व कोकणातून येणाºया क्रीडाप्रेमींची वाहने खारघरमध्ये सेंट्रल पार्क मैदानामध्ये उभी करता येतील का याविषयी चाचपणी सुरू झाली आहे. वाहनतळापासून स्टेडियमपर्यंत एनएमएमटी बसेस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी दोन्ही यंत्रणांच्या वारंवार बैठका सुरू असून कोणत्याही स्थितीमध्ये क्रीडाप्रेमींची गैरसोय होवू नये यासाठी काळजी घेण्यास सुरवात केली आहे.