शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राहणीमान उंचावण्याचे आव्हान

By admin | Updated: January 23, 2017 05:48 IST

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ६२ गावे कॅशलेस करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

नामदेव मोरे / नवी मुंबईकेंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ६२ गावे कॅशलेस करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण परिसरामध्ये अद्याप चांगल्या प्राथमिक सुविधा नाहीत. मलनिस:रण वाहिन्या नाहीत. मुलांना संगणक शिक्षण उपलब्ध होत नसून वाहतुकीच्या चांगल्या सुविधा नाहीत. शासन व प्रशासनाने कॅशलेस व्हिलेज ऐवजी नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून उत्पन्नाची साधने उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया मोहिमेची घोषणा केल्यानंतर राज्यात सर्वत्र डिजिटल व्हीलेज व कॅशलेस व्हिलेजची चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्हा ही त्यामध्ये आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ६२ गावे कॅशलेस करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्हाअधिकारी ते तहसीलदारांपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक तालुक्यामधून कॅशलेससाठी गावांची निवड सुरू आहे. गावे निवडताना ज्या गावांचा यापुर्वीच चांगला विकास झाला आहे व तेथे हे अभियान यशस्वी करता येईल अशाच गावांची निवड होत आहे. आर्थीकदृष्ट्या दुर्बल मागास गावांचा यासाठी विचारही केलेला नाही. यामुळे निवडलेली गावे कॅशलेस होतील ही मात्र जिल्ह्यातील ज्या हजारो गावांमधील गरीब नागरिक जे आत्ताच कॅशलेस आहेत त्यांच्या हाताला काम व कामाला चांगला मोबदला कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर खऱ्या अर्थाने शासनाला डिजिटल व्हिलेज करावयाचे असेल तर प्रत्येक गावामध्ये सुविधा उपब्ध करून देणे आवश्यक आहे. पनवेल, उरणमधील शेतकऱ्यांची जमीन शहर वसविण्यासाठी संपादीत करण्यात आली आहे. खालापूरपर्यंतची जमीन नैना परिसरात जात आहे. कधी काळी शेतीसाठी संपन्न असलेल्या या जिल्ह्याचे झपाट्याने नागरिकरण होत आहे. मात्र येथील मूळ गावांमधील गरिबी शहरीकरणानंतरही जैसे थे आहे.शासनाच्या २०११ च्या जनगनणेच्या अहवालाचा अभ्यास केला तरी रायगड जिल्ह्यातील आर्थीक व सामाजीक स्थितीचा अंदाज येवू शकतो. एकाही शहरामध्ये ८० टक्के मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम झालेले नाही. पनवेल वगळता एकाही शहरामध्ये अत्याधुनीक मलनिस:रण केंद्र नाही. जिल्ह्यातील सर्वच शहरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागामध्येही तशीच स्थिती आहे. सुधागड व तळा सारख्या तालुक्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे ६५ व ६७ टक्के एवढेच आहे. जिल्ह्यातील फक्त १० टक्के घरांमध्ये संगणक व लॅपटॉपची सुविधा आहे. फक्त ७ टक्के घरांमध्ये इंटरनेट वापरण्याची सुविधा आहे. अजून ३८ टक्के घरांमध्ये टेलीव्हीजनची सुविधाही नाही. साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के नसेल व नागरिकांच्या हातामध्ये पैसेच नसतील तर बँकींग सुविधांचा वापर कसा केला जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.