शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

घणसोलीत सीएम चषकची विनापरवाना जाहिरातबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 03:43 IST

मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे.

नवी मुंबई : सीएम चषकच्या नावाखाली घणसोली परिसरात भाजपातर्फे मोठ्या प्रमाणात विनापरवाना जाहिरातबाजी करण्यात आली आहे. विद्युत खांबावर तसेच रस्त्यावर कमानी उभारून मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांचे विनापरवाना फलक झळकत आहेत; परंतु त्यावरील कारवाईकडे पालिकेची चालढकल होत असल्याने प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे. स्पर्धांच्या ठिकाणी तसेच संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून त्यावर भाजपा नेत्यांचे फोटो झळकवले जात आहेत. अशाच प्रकारातून घणसोली कॉलनी परिसरातील रस्ते भाजपाच्या अनधिकृत जाहिरातबाजीने व्यापल्याचे दिसून येत आहेत. घणसोली गावालगतच्या मोकळ्या मैदानावर हा महोत्सव होत आहे; परंतु त्याची बॅनरबाजी घणसोली-कोपरखैरणे मार्गाला जोडणाऱ्या पामबीच मार्गावर करण्यात आलेली आहे, यामुळे हा क्रीडा महोत्सव आहे की जाहिरात महोत्सव, असा प्रश्न घणसोलीकरांना पडला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरातबाजी सुरू असतानाही पालिकेकडून त्यावर कारवाई होत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतर राजकीय अथवा सामाजिक संघटनेने विनापरवाना बॅनरबाजी केल्यास त्यावर तत्काळ कारवाई होते; परंतु घणसोलीत भाजपाचा सीएम चषक क्रीडा महोत्सव सुरू होण्याच्या आठवडा अगोदरपासून बॅनरबाजी करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून नवी मुंबईवर विशेष लक्ष देण्यात येत आहे, त्याकरिता येत्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडण्याचीही शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीएम चषकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून भाजपाचा वातावरणनिर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचीही टीका होत आहे; परंतु प्रशासनाने मात्र आपला कारभार पारदर्शक ठेवून सरसकट अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाईची मागणी होत आहे.शहराला अनधिकृत बॅनरबाजीच्या विळख्यातून सोडवण्याची अत्यंत गरज आहे; परंतु पालिकेच्या अधिकाºयांकडून त्याकडे चालढकल होत आहे. परिणामी, घणसोली पामबीच मार्गावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बॅनरबाजीला अभय मिळत आहे. संबंधित बॅनरबाजांवर गुन्हे दाखल करून पालिकेने आपल्या पारदर्शक कार्यपद्धतीचे दर्शन घडवावे.- योगेश चव्हाण,रहिवासी 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAdvertisingजाहिरात