दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्ही वॉच

By Admin | Updated: August 7, 2016 03:23 IST2016-08-07T03:23:00+5:302016-08-07T03:23:00+5:30

सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाउल उचलण्यात

CCTV Watch on South Navi Mumbai | दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्ही वॉच

दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्ही वॉच

नवी मुंबई : सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाउल उचलण्यात आले आहे. एकूण ५७२ कॅमरे बसविण्याची सिडकोची योजना आहे. यापैकी प्राथमिक स्तरावर खारघर परिसरात १२४ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या नियंत्रण केंद्राचे सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे.
स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात मोडणाऱ्या खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, उलवे, द्रोणागीरी, उरण व न्हावाशेवा या क्षेत्रात सार्वजनिक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. १0८ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून तब्बल ५७२ कॅमरे बसविण्याची योजना आहे. ५ आॅक्टोबर २0१५ रोजी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली होती. २0१७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट सिडकोने ठेवले आहे. त्यानुसार सध्या खारघर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी १२४ कॅमरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे. सोमवार ८ आॅगस्ट रोजी या प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षाचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्दिष्ट व ध्येय
सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सिडकोने या उपाययोजना आखल्या आहेत. याअंतर्गत शहरातमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या ठिकाणे, महत्वाची चौक, टोल नाके, ट्राफिक जंक्शन, रस्ते, उद्याने, रेल्वे स्थानके, शाळा व महाविद्यालये आदी ठिकाणी ही सीसीटीव्हीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात पोलिसांना मदत होणार आहे. गुन्ह्यांचा तपास लावणे, शोधकार्यात सहकार्य आदींसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल, असा सिडकोचा दावा आहे.

Web Title: CCTV Watch on South Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.