पेणच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

By Admin | Updated: February 19, 2016 02:32 IST2016-02-19T02:32:20+5:302016-02-19T02:32:20+5:30

बारावीची परीक्षा असल्याने सकाळी १० वाजता पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूल पेण, म. ना. नेने कन्या विद्यालय व सार्वजनिक विद्यामंदिर पेण या प्रशालांमध्ये

CCTV Watch at Pen's examination center | पेणच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

पेणच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

पेण : बारावीची परीक्षा असल्याने सकाळी १० वाजता पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूल पेण, म. ना. नेने कन्या विद्यालय व सार्वजनिक विद्यामंदिर पेण या प्रशालांमध्ये पालक व विद्यार्थीवर्गाने गर्दी केली होती. पेणमध्ये एकूण १,९८०परीक्षार्थी असून यापैकी १,९१९ विद्यार्थ्यांनी
गुरुवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर लिहिला. कॉपीमुक्त अभियानाासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्याचा उपक्रम पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर प्रशालेने केला असून या परीक्षा केंद्रातील २४ वर्गखोल्यात प्रत्येकी दोन कॅमेरे याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे नेटवर्क प्रिन्सिपल केबिनमध्ये थेट पाहण्याची व्यवस्था आहे. एका चांगल्या अभियानामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी सार्वजनिक विद्यामंदिर प्रशाला पेणची पहिली शाळा ठरली आहे.
कॉपीमुक्त अभियान राबविण्यात शिक्षण मंडळाने पेणच्या प्रायव्हेट हायस्कूलला चांगला रिमार्क दिला. या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण या प्रशालेने आपल्या शिक्षण संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पहिल्याच दिवशी भरारी पथकाने या केंद्राला दोन वेळा भेट दिली.

Web Title: CCTV Watch at Pen's examination center